Saturday, 18 November 2017

Sutonda Fort (Naigaon Fort )

मी आणि आशिष सकाळी कन्नड वरून दुचाकी वर गौताळा मार्गे सुतोंडा किल्ला बघण्यास निघालो,
सकाळी गौताळा घाट वातावारन चांगले असल्यामुळे आम्ही काही फोटो काढले.
आम्हाला नागद गाव लागले,
आम्ही गावात लोकांशी सुतोंडा किल्ला बाबत माहिती घेतली पण कोणास हि माहित नव्हते,
एक वयस्कर माणूस आला आणि त्यांनी आम्हास माहिती दिली,
त्यांनी आम्हास बानोटी गावास जाण्यास सांगितले व तिथून नायगाव पासून तो किल्ला जवळ आहे आसे सांगितले,
नागद पासून आम्हला अंतूर किला चांगला दिसात होता,
नागत ते बानोटी असा प्रवास चालू झाला,
रास्ता थोडा चांगला तर थोडा खराब आहे,
असा प्रकारे आम्ही बानोटी गावास पोहचलो,
होळी चा दिवस व रविवार असल्या मुळे आज बानोटी चा बाजार होता.
बाजार खूप सुंदर होता, छोट्या रोड लगत दुकाने सजलेले होते. आम्हाला गाडी चालवणे देखील अवघड होते बाजार मूळे,. कशी बशी गाडी चालवत आम्ही पोलीस चौकी चा मार्गे बानोटी गावातुन नायगाव ला गेलो.
बानोटीत एक वयस्कर माणूस भेटला त्याला आम्ही किल्ला बदल विचारले,
गावात तो नायगाव चा किल्ला नावाने प्रसिद्ध आहे,
किल्ला वर वेगवेगळी पाणी टाकी आहे, व किल्ला पाणी टाकी करीता प्रसिद्ध आहे असे सांगितले,
बानोटी गाव खूप सुंदर आहे.
नायगाव खूप छोटे गाव आहे,
नायगाव नंतर आम्हाला एक छोटी डोंगर दिसला तोच सुतोंडाकिल्ला आहे,
आम्हाला तिथे एक गुरे चारणार माणूस भेटला व त्याने किल्ला वर जायला दोन वाटा आहेत असे सांगितले,
एक वाट खूप कठीण आहे व एक सोपी आहे,
आम्ही सोप्या वाटेने मार्ग चालू केला,
किल्ला चा आजू बाजूला खूप सुंदर डोंगर आहे,
किल्ला चढण्यासाठी पाऊल वाट सापडत नाही,
खूप छोटी पाऊल वाट आहे.
किल्ला चढताना रस्ता समजत नाही की कोणत्या मार्गे वर जावे,पण समोर एक मोठे डोंगरी दगड कापून सुंदर छोटा मार्गे दिसला.
दोन डोंगर मध्ये एका दगडात छोटा दरवाजा व वर काही कोरीव काम देखील दिसले.

तिथे एक गुहे सारखा रास्ता दिसला व आत मध्ये गुहे सारखा प्रवेश रास्ता दिसला.
थोडे वर चालून गेल्यावर दगडात लेणी सारखे कोरीव काम करून पाण्याची टाकी दिसली,.
परत आणखी वर गेल्यावर पाण्याची टाकी दिसली त्या मध्ये खूप थंडगार पाणी होते.व तिथे निरनिराळे पक्षी पाणी पिण्यास येत होते.डोंगरा वर देखील इतके थंड पाणी बघून खूप आश्चर्ये वाटले.
आणखी वर गेल्या वर एक विटा मध्ये (चुन्यात काम झालेले ) कमान दिसली.
माझया महिती नुसार पाणी टाकी व आतील बांधकाम विटांचे वेगवेगळा शतकातील आहे.
सर्वात वर देखील खूप पाण्याचा टाकया आहे.
वरतून सभोतालचा डोंगराळ परिसर खूप सुंदर दिसतो.
आशा प्रकारे सर्व किल्ला बघितल्या नंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला.
खाली उतरताना आम्ही शॉर्ट कट मार्गे खाली उतरलो .
पूर्ण रस्ता निर मनुष्य होता.
आशा प्रकारे आम्ही सुतोंडा किल्ला बघून नायगाव मार्गे बानोटी आलो.
बानोटी बाजारात थंडगार उसाचा रस पिलो व मग नागद मार्गे गौताळा अभयारण्य तुन कन्नड ला आलो.






Related image


Related image